Join us

'नाजूक दिसणारी, मापात बसणारी..'; केवळ एक्स्प्रेशन्सच्या जोरावर स्वीटूने जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:38 IST

Anvita phaltankar: अन्विताने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या 'वजनदार' या चित्रपटातील 'गोलु पोलू' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर( anvita phaltankar). सध्या अन्विता 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अन्विताने स्वीटू ही भूमिका साकारली असून ती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

कलाविश्वाप्रमाणेच अन्विता सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिने अलिकडेच एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने दिलेल्या एक्स्प्रेशन्समुळे तिने अनेकांची मनं जिंकून घेतली आहे.

अन्विताने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या 'वजनदार' या चित्रपटातील 'गोलु पोलू' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रचंड क्युट एक्स्प्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसई ताम्हणकरप्रिया बापट