Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वीटूसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का? 'देवयानी' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:05 IST

Marathi actress: मधुरा आणि अन्विता यांची फार जुनी मैत्री असून त्या कायम एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

काही काळापूर्वी छोट्या पडद्यावर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका चांगलीच गाजली. ही मालिका संपून आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार अजूनही चर्चेत येत असतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर (anvita phaltankar). या मालिकेत स्वीटू ही भूमिका साकारुन अन्विता घराघरात पोहोचली.अन्विता सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम ती कुटुंबीय, मित्र-परिवारासोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने शेअर केलेला फोटो चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अन्विताने तिच्या एका मैत्रिणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिच्यासोबत असलेली ही मुलगी कोणी साधीसुधी नसून प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे. अन्विताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत दिसत असलेली मुलगी म्हणजे अभिनेत्री मधुरा गोडबोले आहे. मधुराचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे.

मधुरा आणि अन्विता यांची फार जुनी मैत्री असून त्या कायम एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मधुराचं लग्न झालं असून ती फ्रेंच भाषेचे लेक्चर घेते असं म्हटलं जातं. दरम्यान, अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'देवयानी', 'रुंजी',  'गंध फुलांचा गेला सांगून' या तिच्या काही मालिका चांगल्याच गाजल्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक नृत्यांगनादेखील असल्याचं सांगण्यात येतं.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा