Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, मालिका घेणार 20 वर्षांचा लीप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 19:02 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमध्ये पुन्हा एकदा लीप येणार आहे आणि यावेळी हा लीप 20 वर्षांचा असणार आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका चाहत्यांच्या पसंतीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत दोनदा मोठे लीप आले होते. त्यानंतर लीड स्टारकास्ट पूर्णपणे बदलण्यात आली. रिपोर्टनुसार मालिकेमध्ये पुन्हा एकदा लीप येणार आहे आणि यावेळी हा लीप 20 वर्षांचा असणार आहे.

 रिपोर्टनुसार, मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट बदलून नवीन स्टारकास्ट आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या स्टारकास्टला अलविदा करावा लागणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या मालिकेमध्ये प्रणाली राठौर आणि हर्षद चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.  दोघांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

याआधी मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांची लव्हस्टोरी मालिकेमध्ये दाखवण्यात आली होती. दोघांची प्रेमकहाणी सुपरहिट ठरली होती. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. शोमध्ये शिवांगी नायराच्या भूमिकेत होती आणि मोहसिन कार्तिकच्या भूमिकेत होता.

मालिकेच्या पहिल्या पिढीबद्दल बोलायचे झाले तर हिना खान आणि करण मेहरा मुख्य भूमिकेत होते. अक्षरा आणि नैतिक अशी दोन्ही पात्रांची नावे होती. ही मालिका सुरु झाल्यापासून यात कौटुंबिक मूल्ये दाखवण्यात आली आहेत. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटेलिव्हिजनस्टार प्लस