Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिला बाळाला जन्म, आठ वर्षांत दुसऱ्यांदा झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:31 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई

छोट्या पडद्यालवरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ एक आहे. २००९ सालापासून गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. स्टार प्लसवरील या मालिकेतील कलाकारही घराघरात पोहोचले. अक्षरा हे पात्र साकारुन हिना खान तर नैतिकची भूमिका साकारलेला करण मेहरा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. अभिनेत्री पूजा जोशीदेखील ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अक्षराच्या वहिनीची म्हणजेच वर्षाची भूमिका साकारली होती.

पूजा जोशी सध्या कलाविश्वापासून दूर आहे. पण, तरीही ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. पूजा दुसऱ्यांदा आई झाली आहे. पूजाने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पूजाने ही गूडन्यूज चाहत्यांना दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच पूजाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आपल्या लाडक्या लेकीचं नाव पूजाने “रुहाणी” असं ठेवलं आहे.

अनेक मालिकांमध्ये काम करुन पूजाने कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘ये रिश्ता क्या कहलता है’ नंतर पूजा कलाविश्वात फारशी सक्रिय नव्हती. लग्न केल्यानंतर ती संसारात रमली. २०१५ साली तिने पहिल्या मुलीला जन्म दिला होता. आता आठ वर्षांनंतर ती पुन्हा आई झाली आहे.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटेलिव्हिजन