Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारु होणार का किर्लोस्करांच्या घरची सून?; काय असेल आहिल्यादेवीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:45 IST

Paru: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारुचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे.

झी मराठीवर आलिकडेच पारू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. पारुच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढउतार आले असून आता तिच्या आयुष्यात एक ट्विस्ट येणार आहे. किर्लोस्करांची बिझनेस ब्रँड अॅम्बेसिडर असलेली पारू एका जाहिरातीसाठी आदित्यसोबत स्क्रीन शेअर करते. मात्र, या लग्नसोहळ्याला ती खरं लग्न मानते आणि इथेच तिची फसगत होते.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारुचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. मात्र, हा लग्नसोहळा केवळ जाहिरातीपूरताच मर्यादित असतो याची पारुला कल्पना नसते. ज्यावेळी लग्नाचा सीन पूर्ण होतो आणि कट असा आवाज येतो त्यावेळी पारु भानावर येते. पारूने मस्त अभिनय केला असं म्हणत सगळे जण तिचं कौतुकही करतात. परंतु, ज्यावेळी तिच्या अंगावरचे दागिने काढले जातात. त्यावेळी ती गळ्यात मंगळसूत्र देण्यास नकार देते.

दरम्यान, आदित्यसोबत झालेलं लग्न हे खरं नसून फक्त अॅक्टचा एक भाग होता हे मान्य करायला ती तयार नाही. त्यामुळे मंगळसूत्र काढण्यास ती नकार देते. त्यामुळे आता आदित्य खरोखर पारुसोबत लग्न करेल का?आहिल्यादेवी तिचा सून म्हणून स्वीकार करेल का? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार