Join us

ड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 15:43 IST

ड्रामा संपला. पण हो,आदित्यच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही संपलेली नाही.

ठळक मुद्देआधी श्वेता अग्रवाल हिच्यासोबत आदित्य रिलेशनशिपमध्ये होता.

इंडियन आयडल 11 च्या सेटवर आदित्य नारायणनेहा कक्करच्या प्रेमात वेडा झाला होता. इतका की, गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली होती. लग्नाची तारीखही ठरली होती. पण हे लग्न, लग्नाची तारीख हा सगळा खटाटोप नुसत्या टीआरपीसाठी होता. टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये जागा मिळवण्यासाठी शो सुरु असेपर्यंत हा ड्रामा रंगला आणि शो संपल्यावर हा ड्रामाही संपला. पण हो,आदित्यच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही संपलेली नाही. होय, खुद्द नेहा कक्करने आदित्य कोणाशी लग्न करणार याचा खुलासा केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहाने हा खुलासा केला. ‘आदित्य खूप चांगला मुलगा आहे. त्याचे मन अगदी सोन्यासारखे आहे. मला आनंद आहे की, आदित्य लवकरच लग्न करतोय. आपल्या लॉन्गटर्म गर्लफ्रेन्डशी लवकरच तो लग्नगाठ बांधणार आहे. मी त्या दोघांसाठीही मनापासून प्रार्थना करते. आदित्य माझा चांगला मित्र आहे. त्यापेक्षा जास्त काहीही नाही,’असे नेहा या मुलाखतीत म्हणाली.

नेहाच्या या खुलाशानंतर आदित्यच्या आयुष्यात एक मिस्ट्री गर्ल असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात त्याच्या या गर्लफ्रेन्डचे नाव काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ती कोण, कुठली हेही गुलदस्त्यात आहे. हिच्याआधी श्वेता अग्रवाल हिच्यासोबत आदित्य रिलेशनशिपमध्ये होता. पण वर्षभरानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले होते. श्वेतानंतर आदित्यच्या आयुष्यात एका मिस्ट्री गर्लची एन्ट्री झाली. आता आदित्यची ही मिस्ट्री गर्ल कधी जगापुढे येते, ते बघूच.

टॅग्स :आदित्य नारायणनेहा कक्करइंडियन आयडॉल