Join us

दिव्यांका त्रिपाठीला पती विवेक दाहियाने दिले असे सरप्राईज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 06:30 IST

‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आपला पती विवेक दाहिया याला सेटवर अनपेक्षितपणे आलेला पाहून त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी सुखद धक्का बसला. 

ठळक मुद्देविवेक या स्टुडिओच्याच जवळपासच्या भागात चित्रीकरण करीत होतादिव्यांकाची भेट घेण्याचं ठरवून तो या कार्यक्रमाच्या सेटवर आला

‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आपला पती विवेक दाहिया याला सेटवर अनपेक्षितपणे आलेला पाहून त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी सुखद धक्का बसला.  या कार्यक्रमाद्वारे दिव्यांका प्रथमच एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून ते पाहण्यासाठी विवेक मुद्दाम या कार्यक्रमाच्या सेटवर आला होता.  दिव्यांका आणि विवेक हे दोघेही चित्रीकरणाच्या कामात अतिशय व्यग्र असल्याने त्यांना एकमेकांबरोबर एकत्र राहण्यासाठी वेळच मिळत नाही. आता प्रथमच ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीचा चित्रीकरणाचा हा पहिलाच दिवस होता.

विवेक या स्टुडिओच्याच जवळपासच्या भागात चित्रीकरण करीत होता. त्यामुळे त्याने दिव्यांकाची भेट घेण्याचं ठरवून तो या कार्यक्रमाच्या सेटवर आला. त्याला अनपेक्षितपणे आलेला पाहून दिव्यांका जशी प्रफुल्लित झाली.  तिचं मनोबल वाढविण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी विवेक तिचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत सेटवरच थांबला.

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाद्वारे दिव्यांका त्रिपाठी प्रथमच एक सूत्रसंचालक म्हणून काम करणार आहे. महान संगीतकार ए. आर. रेहमान हे त्यात सुपरगुरू म्हणून काम पाहात असून अदनान सामी, हर्षदीप कौर, कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षक (परीक्षक) म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहियाद व्हॉइस शो