Join us
Daily Top 2Weekly Top 5

विशाल कोटियन गेला घराबाहेर! आता राकेश बापट आणि तन्वी कोलतेपैकी कोण जिंकणार? सर्वांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 22:30 IST

टॉप ३ पैकी विशाल कोटियनला 'बिग बॉस मराठी ६'च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. विशालच्या घराबाहेर जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड फिनालेमध्ये आतापर्यंत दिपाली सय्यद आणि अनुश्री माने यांचा 'बिग बॉस मराठी ६' मधील प्रवास संपला आहे. आता टॉप ३ पैकी विशाल कोटियनला 'बिग बॉस मराठी ६'च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. विशालच्या घराबाहेर जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. विशाल हा घरातील स्ट्राँग स्पर्धक होता आणि 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीचा दावेदारही होता. परंतु विशाल घराबाहेर गेल्याने सर्वांना धक्का बसला आहे.असा होता विशालचा प्रवास

विशाल कोटियनने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात ओंकार राऊतसह डॅशिंग एन्ट्री केली होती. विशालने याआधी अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. विशालचा घरातील प्रवास खूप गाजला. विशेषतः विशाल आणि रुचिता जामदार यांचं मैत्रीपलीकडलं नातं चांगलंच चर्चेत राहिलं. रुचिता विशालमध्ये जवळीक वाढत होती. यामुळे दोघांनाही त्रास झाला. विशालचे घरात राकेश बापट आणि ओंकार राऊतसोबत टोकाचे वाद झाले.इतकंच नव्हे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात शेवटच्या काही दिवसांत विशाल आणि राकेशमध्ये मारामारी झाली होती. त्यामुळे बिग बॉसने विशालला तिकिट टू फिनालेपासून दूर ठेवलं. विशालला मोठी शिक्षा मिळाली. तरीही स्वतःच्या गेमच्या जोरावर आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे विशालने फायनलपर्यंत मजल मारली होती. आता विशाल घराबाहेर गेल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता राकेश बापट आणि तन्वी कोलते हे टॉप २ स्पर्धक म्हणून राहिले आहेत. या दोघांपैकी कोण विजेता होणार हे थोड्या वेळात कळेलच.

English
हिंदी सारांश
Web Title : Vishal Kotian Evicted! Rakesh Bapat or Tanvi Kolte to Win?

Web Summary : Grand Finale shock! Vishal Kotian out of Bigg Boss Marathi 6. Rakesh Bapat and Tanvi Kolte remain as Top 2 finalists. Winner announcement soon!
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनटिव्ही कलाकार