Join us

'तुला मागे वळून बघायची गरज नाही..उभ्या महाराष्ट्राला तुला...',विशाखा सुभेदारने समीर चौगुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:04 IST

Maharashtrachi Hasya Jatra: समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांच्या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विशाखा सुभेदारने समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते.

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. समीर चौघुले (Samir Choughule) आणि विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar) यांची जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. 

विशाखा सुभेदारने समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. विशाखाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या कार्यक्रमातून बाहेर पडली. समीर चौघुलेचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त विशाखाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

समीरचा सोबतचा फोटो शेअर करत विशाखाने लिहिले,  आत्ता तुला मागे वळून बघायची गरज नाही..खूप आनंदात, सुखात रहा. कारण उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचं आहे.. सगळ्यांनाच्या गळ्यातला ताईत झाला आहेस तू..! आपल्या जोडीने खूप छान छान प्रसंग अनुभवले आहेत..

आपण भांडलो, रुसलो, हट्टी वागलो, हिरमूसलो, हसलो,मस्ती केली, खोड्या फाजील काढल्या, किस्से.आणि प्रेमही तितकेच.टॉम अँड जेरी सारखं... 💞 सम्या जे जे तुला हवं ते ते तू मिळवतोच.. त्यामुळे ते तुला ळेलच.तेरा होगया रे..... तू जीत गया रे...मनापासून शुभेच्छा.. सम्या. love u दोस्ता. अस कॅप्शन तिने दिलं आहे. विशाखाच्या या फोटोवर समीरने सुद्धा कमेंट केली आहे. समीरने लिहिले, विशू तुला खूप प्रेम❤️❤️❤️❤️ i miss you.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारसेलिब्रिटी