Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video विदुलाने घेतला मालिकेतून तात्पुरता ब्रेक; मन:शांतीसाठी पोहोचली केदारनाथला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:43 IST

Vidula chougul: विदुलाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना थोडक्यात केदारनाथचं दर्शन घडवलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले (vidula chougule). जीव झाला येडापिसा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली विदुला सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट ती चाहत्यांना देत असते. नुकताच विदुलाने तिच्या कामाच्या गडबडीतून ब्रेक घेतला आहे आणि ती थेट केदारनाथला पोहोचली आहे. येथील एक सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 सोबतच या व्हिडीओच्या बँकग्राऊंडला 'नमो नमो शंकरा' हे गाणं जोडलं आहे. सोबतच तिने लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. ज्या ठिकाणी मन:शांतीची सुरुवात होते, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

विदुलाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर असंख्य कमेंट केल्या आहेत. तुझ्यामुळे आम्हाला केदारनाथचं दर्शन झालं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, अन्य चाहत्यांनी भगवान शंकराचा जयघोष केला आहे. दरम्यान, जीव झाला येडापिसा ही विदुलाची मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. या मालिकेत तिने सिद्धी ही मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच ती बॉईज ३ या सिनेमातही झळकली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमाकेदारनाथ