Join us

Video : अविनाश नारकरांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकर व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या 'औक्षवंत हो...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:59 IST

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar).  अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे कपल सोशल मीडियावर सक्रीय असतात. बऱ्याचदा ते ट्रेडिंग रिलवर थिरकताना दिसतात. बऱ्याचदा त्यांचे रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना मिळतात. या कपलचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतचं अविनाश नारकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या लाडक्या बायकोनं त्यांचं औक्षण केलं. याचा एक खास व्हिडीओ ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर  शेअर केला आहे. 

ऐश्वर्या यांनी व्हिडीओ शेअर करत अविनाश नारकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत, ऐश्वर्या अविनाश यांचं औक्षण करताना पाहायला मिळत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "औक्षवंत हो…कायम आनंदी रहा…तू खूप खूप महत्वाचा आहेस माझ्यासाठी…सगळ्यांसाठी…'. ऐश्वर्या नारकरांच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश यांचा 'डंका हरी नामाचा' हा चित्रपट १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर ऐश्वर्या नारकर सिनेसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत.  सध्या त्या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'रुपाली राज्याध्यक्ष' हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीअविनाश नारकरसोशल मीडिया