Join us

ओह फुगनिया! नवऱ्याला जवळ ओढून गालावर केलं kiss; वनिताचा रोमँंटिक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:02 IST

वनिताच्या हा कॉमेडी व्हिडिओ चाहत्यांना आणि इतर कलाकारांनाही खूप आवडलाय.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार वनिता खरात (Vanita Kharat) काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह तिने लग्न केलं. वनिताने केलेलं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूटही चांगलंच व्हायरल झालं होतं. पावसात चिंब भिजत नवऱ्याला किस करतानाचा तिचा फोटो होता. म्हणूनच वनिताला अतिशय बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

वनिताने आता नवऱ्यासोबत एक विनोदी आणि तितकाच रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती नवऱ्याचा शर्ट खेचून त्याला जवळ ओढते आणि नंतर त्याच्या गालावर किस करते. यावेळी बॅकग्राऊंडला तिने नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक डायलॉग लावला आहे. 'ओह फुगनिया..हम तुम्हे इतना चाहते है इतना चाहते है सिना चीर के दिखाए' असा तो विनोदी डायलॉग आहे.

वनिताच्या हा कॉमेडी व्हिडिओ चाहत्यांना आणि इतर कलाकारांनाही खूप आवडलाय. जो तो यावर हसताना दिसतोय. वनिताने तिच्या खास शैलीत नवऱ्यावरचं प्रेम व्यक्त केलंय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस पडलाय.

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल व्हायरल