Join us

वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:24 IST

वनिताने यंदा तिचा कितवा वाढदिवस होता, याबद्दलही खुलासा केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून वनिता खरात (Vanita Kharat) ही घरोघरी पोहचली. तिच्या विनोदांनी आणि अभिनयाने वनिताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तसेच वनिताने मोठ्या पडद्यावरही तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. काही दिवसांपुर्वीचं वनिता खरातनं आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय. वनिताने यंदा तिचा कितवा वाढदिवस होता, याबद्दलही खुलासा केला आहे.

नुकतेच अभिनेत्रीने १९ जुलै रोजी ३१ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीचा एक व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यात तिच्या संपुर्ण दिवसाची झलक दिसून येतंय. तसेच अभिनेत्रीने स्वत: तिच्या वयाबद्दल सांगितलं. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "३१ वा वाढदिवस... रंगमंचावर गेला!  १९ जुलै २०२५ आजचा दिवस खास होता. कारण तो कामात गेला, माझ्या स्वप्नांसह गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रेक्षकांच्या प्रेमात गेला", असं तिनं म्हटलं. 

पुढे तिनं लिहलं, "मी कलाकार आहे. रंग, प्रकाश, शब्द, हालचाली यांच्यात मी माझं आयुष्य वाहिलं आहे. वाढदिवस असो की कोणताही दिवस, माझ्यासाठी खरी भेट म्हणजे प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांचा आवाज, त्यांच्या डोळ्यातलं समाधान आणि मनातून आलेली दाद.हेच प्रेम मिळालं आज.त्यामुळे वाटतं. प्रत्येक दिवस हा एक नवा वाढदिवसच असावा! जिथे काम असावं, कला असावी, आणि तुमचं असं भरभरून प्रेम असावं! या प्रवासात साथ देणारा माझा मित्र परिवार, कुटुंब, रसिक प्रेक्षक यांचे मनापासून आभार.माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ३१ पूर्ण  आणि प्रवास अजून सुंदर होणार आहे", या शब्दात वनितानं आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  

टॅग्स :वनिता खरातमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा