Join us  

हिला एअरपोर्टवर एन्ट्रीच द्यायला नको...!  उर्फी जावेदचा पारदर्शक ड्रेस पाहून नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:27 PM

Urfi Javedने ‘बिग बॉस ओटीटी’त धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत आहे.

बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT) स्पर्धक असलेल्या उर्फी जावेद (Urfy Jawed) शोमधून आठवडाभरातच बाहेर पडली होती. पण इतक्या कमी वेळातही ती चर्चेत आली. आता काय तर रोजच ती चर्चेत असते.  विचित्र, बोल्ड कपड्यांमुळे रोज ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.  अलीकडेच उर्फी जावेद असा काही बोल्ड ड्रेस परिधान करून एअरपोर्टवर दिसली की, लोकांनी पुन्हा तिला ट्रोल केलं.एअरपोर्टवरचा उर्फीचा लुक पाहून सगळेच हैराण झालेत. यावेळी तिने सी-थ्रू ब्लॅक टॉप आणि काळी पँट घातली होती. तिचा टॉप सर्व बाजूंनी पारदर्शक होता. याच ड्रेसमध्ये तिने पापाराझींना बिनधास्त पोझ दिल्यात. तिचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि युजर्सनी तिला फैलावर घेतलं. 

तू किम कार्दशियन बनण्याचा प्रयत्न का करतेय, असा सवाल अनेक युजर्सनी तिला केला. अशा कपड्यांमध्ये हिला विमानतळावर एन्ट्रीचं द्यायला नको, एअरपोर्टवर असे कपडे कोण घालते? अशा शब्दांत काही युजर्सनी तिला ट्रोल केलं.याआधीही अशाच बोल्ड कपड्यांमुळे उर्फी ट्रोल झाली आहे.उर्फी जावेद  ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाली होती. मात्र एका आठवड्यानंतरच ती घरातून बाहेर पडली होती.  तेव्हापासून ती तिच्या कपड्यांमुळेच काय ती चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या इंस्टाग्रामवर तिचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहत्यांचं लक्ष वेधण्यासाठी  उर्फी नियमितपणे इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.मुंबईत येण्यापूर्वी उफीर्ने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे.  टेढी-मेढी फॅमिली मधून तिचा अ‍ॅक्टिंग डेब्यू झाला होता. यानंतर बडे भैया की दुल्हनिया, नामकरण, मेरी दुर्गा आणि  जीजी माँ  यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस