Join us
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल फूल बनाया! उमा भेंडेंच्या सुनेनी चाहत्यांसोबत केला प्रँक; शेअर केलेला लीप फिलरचा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 15:49 IST

Shweta mahadik: श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने तिच्या ओठांवर सर्जरी केल्याचं दिसून येत होतं.

गेल्या काही काळामध्ये कलाकार मंडळी त्यांच्या लूकबाबतीत कमालीचे सजग झाले आहेत. त्यामुळेच अनेक कलाकारांनी सर्जरीच्या माध्यमातून त्यांच्या लूकमध्ये बदल केला आहे. यात नुकतेच अभिनेत्री श्वेता महाडिक हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये श्वेताने लीप फिलर केल्याचं दिसून येत होतं. इतकंच नाही तर अनेकांनी तिच्या या लूकमुळे तिला ट्रोलही केलं होतं. मात्र, या फोटोमागील सत्य नुकतंच समोर आलं आहे.

श्वेता ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांची सून आहे. श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती सोशल मीडियावर क्रिएटिव्ह आयडियाज शेअर करत असते. श्वेता महागड्या पर्स, इअर रिंग्ज, डिझायनर कपडे कमी खर्चात कसे तयार करता येतील याच्या आयडिया चाहत्यांसोबत शेअर करत असते.  यामध्येच तिने तिचा लीप फिलर केलेले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. इतकंच नाही तर तुला हे अजिबात शोभत नाही, तुझा पूर्वीचा लूक चांगला होता असं म्हणत लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. परंतु, श्वेताने खरोखरच लीप फिलर केलं नसून हा फक्त एप्रिल फूलचा प्रँक होता.

श्वेताने मेकअपच्या माध्यमातून तिच्या ओठांची रचना बदलली होती. यात तिचे ओठ प्रचंड मोठे आणि विचित्र दिसत होते. श्वेताने इन्स्टाग्रामवर तिच्या लीप फिलरच्या फोटोमागील सत्य सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे.

दरम्यान, ज्या लोकांनी श्वेताला ट्रोल केलं होतं. त्याच लोकांनी कमेंट करत तिची माफीही मागितली आहे. तसंच हा प्रँक खरा वाटला होता असंही काही जणांनी म्हटलं आहे. श्वेता कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, लेकीच्या संगोपनासाठी तिने काही काळासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी