Join us

पुन्हा सुरु होणार ठिपक्यांची रांगोळी; ज्ञानदाने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:56 IST

Thipkyanchi rangoli: ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आता टीव्ही ऐवजी 'या' ठिकाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी (thipkyanchi rangoli). काही काळापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यावर प्रेक्षकांमध्ये नाराजीचा एकच सूर उमटला होता. अनेकांनी ही मालिका पुन्हा सुरु करा अशी जोरदार मागणी केली होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून खरोखरच मालिकेच्या मेकर्सनी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने एक व्हिडीओ शेअर करत याविषयीची माहिती दिली.

ज्ञानदा म्हणजेच मालिकेतील अप्पू हिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु, ही मालिका टीव्हीवर दिसणार नसून युट्यूबवर दिसणार आहे. तेही अगदी दररोज.

स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनेलवर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सगळे भाग आता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ९ वाजता हे भाग प्रेक्षकांना पाहता येतील असं ज्ञानदाने सांगितलं आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना मोठी पर्वणीच मिळाली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार