Join us

Video: मायलेकींची होणार भेट; दिपा सांगणार दिपिकाला आई असल्याचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 18:45 IST

Rang Maza Vegla: दिपाकडे दिपिकाची कस्टडी जाऊ नये कार्तिक शक्य होतील तितके प्रयत्न करत आहे. परंतु, दिपिकासमोर तिच्या आईचं सत्य येणार आहे.

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. दिपिका आपलीच लेक असल्याचं सत्य दिपाला समजलं आहे. त्यामुळे कायदेशीरित्या दिपिकाचा ताबा मिळावा यासाठी दिपाने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, दिपाकडे दिपिकाची कस्टडी जाऊ नये कार्तिक शक्य होतील तितके प्रयत्न करत आहे. परंतु, दिपिकासमोर तिच्या आईचं सत्य येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपिका दिपाला तिच्या आईचं सत्य विचारते. माझी आई कोण?, कुठे राहते? असे बरेच प्रश्न दिपिका विचारते. त्यामुळे न रहावून दिपा आपण तुझी खरी आई असल्याचं दिपिकाला सांगते. 

दरम्यान, दिपाने सांगितलेलं हे सत्य ऐकल्यावर दिपिका गोंधळून जाते. त्यामुळे आता दिपिका यावर काय प्रतिक्रिया देणार, कार्तिकचं यावर काय मत असेल आणि पुढे या मालिकेत काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार