Join us

पिरतीचा वनवा उरी पेटला: यंदाचा व्हॅलेंटाइन डे होणार खास; अर्जुन-सावीमध्ये खुलणार प्रेमाचा अंकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:56 IST

Tv serial: अखेर अर्जुन करणार सावीचा स्वीकार

छोट्या पडद्यावर सध्या पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका चांगलीच गाजत आहे. सावी आणि अर्जुन या दोघांमधील भांडणं आता कुठे कमी होऊ लागली आहेत. इतकंच नाही तर या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यातील मतभेद, वाद सगळं काही मिटणार आहेत. त्यामुळे आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

आतापर्यंत सावी आणि अर्जुन या जोडीमध्ये सतत वाद होताना प्रेक्षकांनी पाहिले आहेत. मात्र, पहिल्यांदाच या दोघांमधील प्रेम, मैत्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेत एक नवी कथा दिसून येणार आहे.

आतापर्यंत सावीने नेहमीच अर्जुनसाठीचं प्रेम व्यक्त केलं. पण अर्जुनने सावीच्या भूतकाळामुळे तिला स्वतःपासून दूर करत आला आहे. येत्या १५ फेब्रुवारीच्या भागात अर्जुन सावीचा स्वीकार करणार आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी अर्जुनने सावीसाठी स्पेशल सरप्राईज प्लॅन केला आहे. 

दरम्यान, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अर्जुन आणि सावी एकत्र डान्सही करणार आहे. विशेष म्हणजे आता यापुढे सावी आणि अर्जुन एकत्र येणार असून दोघं मिळून संकटांचा एकत्रितपणे सामना करणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार