Join us

यश पाठोपाठ समीरही पडणार शेफालीच्या प्रेमात? यशसमोर देणार कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:16 IST

Mazi tuzi reshimgath: एकीकडे नेहा आणि यशची लव्हस्टोरी खुलत आहे. तर दुसरीकडे समीरदेखील शेफालीच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या लव्हट्रॅक सुरु आहे. एकीकडे नेहा आणि यशची लव्हस्टोरी खुलत आहे. तर दुसरीकडे समीरदेखील शेफालीच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, समीर त्याच्या मनातील भाव व्यक्त करताना आढेवेढे घेत आहे. यामध्येच आता यश समीरच्या तोंडून त्याचं शेफालीवर प्रेम असल्याचं वदवून घेणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेफाली नसल्यामुळे समीर तिला मिस करत असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर त्याची ही चलबिचलता यशला समजते त्यामुळे मुद्दाम तो समीरला शेफालीच्या प्रेमात पडलास का? असा प्रश्न विचारतो. मात्र, त्यावर कावराबावरा झालेला समीर नकार देतो.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हळूहळू समीरसुद्धा शेफालीच्या प्रेमात पडतोय की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना येत्या भागांमध्येच मिळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार