Join us
Daily Top 2Weekly Top 5

मन झालं बाजिंद: लवकरच उलगडणार राया-कृष्णाच्या मृत्यूचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:38 IST

Mann zal bajind: सोशल मीडियावर राया आणि कृष्णा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांच्या यादीमध्ये 'मन झालं बाजिंद' या मालिकेचं आवर्जुन नाव घेतलं जातं. सुरुवातीला एकमेकांसोबत जराही न पटणारे राया आणि कृष्णा लग्नानंतर एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. मात्र, असं असलं तरीदेखील कृष्णाच्या आयुष्यात येणारी संकट काही केल्या कमी होत नसल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर राया आणि कृष्णा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांचा खरंच मृत्यू झाला की नाही ये त्या रविवारी १ तासाच्या महाएपिसोडमध्ये कळणार आहे.

राया आणि कृष्णा यांचा हार घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. खरंच राया आणि कृष्णाचा मृत्यू झाला का? यापुढे आता मालिकेत कोणतं वळण येणार यासारखे अनेक प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. परंतु, येत्या नव्या वर्षात २०२२ मध्ये प्रेक्षकांना सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. 

दरम्यान,  २जानेवारी २०२२ रोजी मन झालं बाजिंद या मालिकेचा महाएपिसोड संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. या भागात मालिकेत राया आणि कृष्णासोबत काय होतं. त्यांचा मृत्यू कसा होता? खरंच त्यांचा मृत्यू झालाय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहे 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार