Join us
Daily Top 2Weekly Top 5

मन झालं बाजिंद: अखेर गुली मावशीचं सत्य येणार समोर; सख्ख्या बहिणीला रंजनाच काढणार घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:36 IST

Man zala bajind:आतापर्यंत रंजना कायम गुली मावशीच्या बोलण्यात येऊन घरात वागत होती. त्यामुळे तिनेदेखील राया व कृष्णाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला.

छोट्या पडद्यावरील 'मन झालं बाजिंद' या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राया आणि कृष्णा त्यांचा संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे गुली मावशी, अंतरा आणि ऋतिक वारंवार त्यांच्या संसारात विष पेरायचं काम करत आहेत. मात्र, विधातेंच्या कुटुंबावर वारंवार संकंट गुली मावशीमुळे येत असल्याचं सत्य आता समोर येणार आहे. इतकंच नाही तर तिला विधातेंच्या घरातून हकलून दिलं जाणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील गुली मावशीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रायाची आई म्हणजेच रंजना विधाते स्वत: सख्ख्या बहिणीला घराबाहेर काढते.

आतापर्यंत रंजना कायम गुली मावशीच्या बोलण्यात येऊन घरात वागत होती. त्यामुळे तिनेदेखील राया व कृष्णाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता गुलीचं सत्य तिच्यासमोर आलं असून तिनेच गुली मावशीला घरातून बाहेर हकलवून लावलं आहे.

दरम्यान, गुली मावशीचं बिंग फुटल्यानंतर तिची रवानगी थेट विधातेंच्या घरातून तुरुंगात होते. मात्र, आता गजाआड गेलेली गुली कोणतं नवं कारस्थान रचणार?तिच्या पश्चात ऋतिक आणि अंतरा विधातेंच्या घरात राहणार की नाही? निदान आता तरी राया-कृष्णा सुखाने संसार करणार की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार