Join us

इंद्रासमोर दिपू देणार प्रेमाची कबुली; I Love You म्हणत व्यक्त करणार प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:23 IST

Man udu udu zal: काही दिवसांपूर्वीच इंद्राने जाहीरपणे दिपूसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर आता दिपूही तिच्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. 

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. या मालिकेतील दिपू आणि इंद्रा यांची कमिस्ट्री प्रेक्षकांना पहिल्या दिवसांपासून विशेष भावली आहे. त्यामुळे सध्या ही मालिका टीआरपीमध्ये यशस्वी घोडदौड करत आहे. काही दिवसांपूर्वीच इंद्राने जाहीरपणे दिपूसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर आता दिपूही तिच्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. 

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिपू एका ग्रिटिंग कार्डच्या मदतीने इंद्राला I Love You म्हणणार आहे. विशेष म्हणजे दिपू मोठं धाडस करुन भर रस्त्यात तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

दरम्यान, दिपूने जरी इंद्राला भररस्त्यात I Love You चं ग्रिटिंग कार्ड दिलं असलं तरीदेखील इंद्राला तिच्या तोंडून ते तीन प्रेमाचे शब्द ऐकायचे आहेत. त्यामुळे दिपू हे कार्ड दाखवल्यानंतर इंद्रा तेथून लगेचच निघून जातो. म्हणूनच, आता पुढे या मालिकेत काय होत?इंद्रा नेमकं असं अचानकपणे का निघून जातो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे