Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया रुग्णालयात दाखल, ट्युमर आढळल्याने करावी लागली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:37 IST

मुंबईतील नानावटी रुग्णालयात सध्या ती उपचार घेत आहे.

छोट्या पडद्यावरील 'कोमोलिका' नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) रुग्णालयात अॅडमिट आहे. मानेत ट्युमर आढळल्याने तिच्यावर नुकतीच सर्जरी करण्यात आली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिजने रुग्णालयातील व्हिडिओ शेअर केला. मुंबईतील नानावटी रुग्णालयात सध्या ती उपचार घेत आहे. डॉक्टरांनी तिला काही दिवस आरामाचा सल्ला दिला आहे. 

उर्वशीने तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. ती म्हणाली, 'मला सर्जरी करावी लागली कारण डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीलाच मला मानेत ट्युमर असल्याचं समजलं. सर्जरी यशस्वी झाली आहे आणि डॉक्टरांनी मला १५ ते २० दिवस आरामाचा सल्ला दिला आहे.'

उर्वशीने नुकतंच अनुज सचदेवासोबत झालेल्या घटस्फोटावरही भाष्य केलं. ती म्हणाली,'१८ व्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर मला कधीच खरं प्रेम मिळालं नाही. १६ व्या वर्षी माझं लग्न झालं तर १७ व्या वर्षी मी जुळ्या मुलांना जन्म दिला. घटस्फोटानंतर मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आले. इथे मला माझ्या  वैयक्तिक आयुष्यावरुन कोणीही हिणवलं नाही. शिवाय मी कामात खूप फोकस्ड होते. कोणीचा माझ्यावर वाईट डोळा आहे हे मला जिथे जाणवलं तिथेच मी वेळीच ते थांबवलं.'

उर्वशीने 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेत कोमोलिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिचं हे खलनायकी पात्र चांगलंच गाजलं होतं. ती 'बिग बॉस 16' ची विजेतीही राहिली आहे. 'कही तो होगा', 'बडी दूर से आए है', 'चंद्रकांता', 'नागिन 6' या टीव्ही शोजमध्ये तिने काम केले आहे. 

टॅग्स :उर्वशी ढोलकियाटिव्ही कलाकारहॉस्पिटल