Join us

लग्नानंतर २२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीचा Divorce! पदरात दोन मुलं, दिग्दर्शकासोबत थाटलेला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:56 IST

आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर २२ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला आहे.'

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर २२ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला आहे.' पांड्या स्टोर' फेम अभिनेत्री पल्लवी राव पतीपासून वेगळी झाली आहे. पल्लवीने दिग्दर्शक असलेल्या सूरज राव यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. 

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पल्लवीने पतीसोबत घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं आहे. "सूरज आणि मला दोन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून आमच्यात बिनसलं होतं. त्यामुळे आता आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे आमच्यासाठी खूप कठीण होतं. कारण आम्हाला २१ वर्षांची मुलगी आणि १८ वर्षांचा मुलगा आहे. पण, कधी कधी सहमतीने वेगळं होणं आणि शांततापूर्ण जीवन जगणं चांगलं असतं. मी सूरज यांचा आदर करते आणि नेहमी त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करेन", असं पल्लवीने सांगितलं. 

पल्लवीने 'कयामत से कयामत', 'कुल्फी कुमार बाजेवाला', 'शुभारंभ', 'पांड्या स्टोर' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सूरज राव यांनी 'क्योंकी सास भी कभी बहु थी', 'शाका लाका बूम बूम' यांसारख्या हिट मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. एका मालिकेच्या सेटवरच ते दोघे एकमेकांना भेटले होते. २००३ मध्ये लग्न करत त्यांनी संसार थाटला होता. आता लग्नाच्या २२ वर्षांनंतर ते वेगळे झाले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट