Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ४५ व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेत्री, कधी केलं टक्कल तर कधी उडाली मृत्यूची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 17:46 IST

वयाच्या ४५ व्या वर्षीही त्यांच्या लुक आणि फिटनेसमध्ये बदल झालेला नाही.

हिंदी टीव्ही मालिकेतील अनेक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे जया भट्टाचार्य (Jaya Bhattacharya). त्यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. हिंदी मालिका, सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वयाच्या ४५ व्या वर्षीही त्यांच्या लुक आणि फिटनेसमध्ये बदल झालेला नाही. गेल्या २२ वर्षांपासून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

एका मुलाखतीत जया भट्टाचार्य यांनी सांगितलं की त्यांची खरंतर डान्सर आणि सिंगर बनण्याची इच्छा होती. त्यांनी अनेक वर्ष प्रशिक्षणही घेतलं आहे. त्यांची आई गायिका होती तर वडील तबला वादक होते. त्यांच्या कुटुंबातील अनेक लोक हे संगीत इंडस्ट्रीशी जोडले आहेत.साहजिकच जया यांची आवडही त्याच क्षेत्रात होती. मात्र त्यांना अभिनय क्षेत्रात ब्रेक मिळाला आणि त्यांनी त्यातच करिअर केलं.

आजपर्यंत आहेत अविवाहीत

जया भट्टाचार्य यांनी आजपर्यंत लग्न केलेलं नाही. काही वर्षांपूर्वी त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र ते नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर त्यांनी सिंगल राहणंच पसंत केलं. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. जे वाचून त्यास स्वत:च हैराण झाल्या. त्यांनी सोशल मीडियावर 'सगळं ठीक आहे, जीवंत आहे, मस्त आहे' असं पोस्ट केलं होतं.

लुकची चिंता नाही

कोव्हिडच्या वेळी जया यांचे अनेक फोटो समोर आले होते. यामध्ये त्यांनी टक्कल केलेलं दिसलं होतं. यावर त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या,'मी लुकची कधीच चिंता करत नाही. मी रोजच्या जीवनात काहीच मेकअप करत नाही आणि कोणत्याही कॉस्मेटिक वस्तू वापरत नाही.'

जया भट्टाचार्य यांनी 'कोशिश','क्योंकी सांस भी कभी बहू थी','विरासत','झांसी की रानी','प्यार की थपकी' यासह ४० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'सिर्फ तुम', 'फिजा', 'लज्जा','एक विवाह ऐसा भी','मिमी,'देवदास' या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या 'पलको की छांव मे 2' या मालिकेत दिसत आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्न