Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे माँ माताजी! 'तारक मेहता...' फेम दयाबेनचा बोल्ड लूक व्हायरल, मिनी स्कर्टमध्ये केला होता डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:33 IST

अभिनेत्री दिशा वकानीचा एक जुना म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेतील 'दयाबेन' हे पात्र सर्वांच्याच पसंतीचं आहे. अभिनेत्रीने दिशा वकानीने (Disha Vakani) दयाबेनची भूमिका साकारली होती. तिचा हटके आवाज, गरबा करण्याची स्टाईल, जेठालाल आणि दयाबेन यांच्यातील भांडणं हे सगळंच प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. काही वर्षांपूर्वीच दिशा वकानीने मालिकेला रामराम केला. यानंतर आजपर्यंत दयाबेनच्या जागी कोणालाच घेतलेलं नाही. तिच्यासारखा अभिनय फक्त तिलाच जमू शकतो. मालिकेत नेहमी गुजराती स्टाईल साडीत दिसणाऱ्या दयाबेनचा ग्लॅमरस अवतार कधी पाहिलाय का?

अभिनेत्री दिशा वकानीचा एक जुना म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. साध्या दिसणाऱ्या दयाबेनचा असा लूक पाहून कोणीही हैराणच होईल. 'भिगरी गा...' या म्युझिक व्हिडिओत ती काम करत आहे. यामध्ये दिशा वकानी निळ्या रंगाच्या सिमरी टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे. तिने भडक मेकअपही केला आहे. दिशाचा हा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. नेहमी गुजराती साडी आणि ज्वेलरीमध्ये साध्या लूकमध्ये दिसणाऱ्या दिशाचा हा लूक विश्वास न बसणाराच आहे. 

दिशा वकानीने थिएटरपासून करिअरची सुरुवात केली. तिने गुजरातीमध्ये अनेक शोज केले आहेत. 1997 मध्ये ती सिनेमातही दिसली पण तिला फारशी जादू पाडता आली नाही. यानंतर तिला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मिळाली आणि तिचं नशीबच बदललं. 2017 मध्ये दिशाने संसारात लक्ष द्यायचं म्हणून मालिकेला रामराम केला. चाहते अजूनही तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. 

टॅग्स :दिशा वाकानीटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरलतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा