Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आशिर्वाद तुझा...' फेम अभिनेत्री अमृता पवारचं सुंदर फोटोशूट, नवऱ्याच्या रोमँटिक कमेंटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 11:40 IST

नुकतेच अमृताने शेअर केलेल्या साडीतील फोटोवर नवऱ्याने रोमँटिक कमेंट केली आहे. 

अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री. 'आशीर्वाद तुझा एकविरा आई' या मालिकेत ती भूमिका साकारत आहे. तिच्या कामाचं कौतुकही होत आहे.तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. गेल्या वर्षीच अमृता नील पाटीलसह (Neel Patil) विवाहबंधनात अडकली. नुकतेच तिने शेअर केलेल्या साडीतील फोटोवर नवऱ्याने रोमँटिक कमेंट केली आहे. 

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अमृता आणि नील यांचा विवाह थाटात पार पडला. अमृताने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत छानसे फोटोशूट केले. पारंपारिक लुकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि हार , नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा असा अमृताचा लुक होता. या लुकवर अमृताचा नवरा फिदा झाला. 

अमृताने या फोटोंना दोन कॅप्शन दिले आहेत. "तू किसी रेल सी गुज़रती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ" हे गाण्याचे बोल तिने कॅप्शनमध्ये लिहिले. यावर तिचा नवरा नीलने 'फेब्रुवारी 2022 पासून थरथरत आहे' अशी कमेंट केली आहे. तसंच अमृताच्या दुसऱ्या फोटोवर नीलने कमेंट करत लिहिले,'माय ब्युटिफुल प्रिंन्सेस.'

अमृताने अनेक मालिकांमध्ये आतापर्यंत काम केलं आहे.'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय 'स्वराज्यजननी जिजामाता', 'जिगरबाज' या मालिकांमध्येही तिने भूमिका साकारली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडियापती- जोडीदार