Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:00 IST

Holi 2024 : होळी सेलिब्रेशननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकरी संतापले, म्हणाले -"तू पार्वतीची भूमिका..."

देशात सर्वत्र होळीचा उस्ताह आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात होळी सेलिब्रेट करताना दिसतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या होळी पार्टी हा चर्चेचा विषय असतो. यंदाही सेलिब्रिटींकडून उत्साहात होळी सेलिब्रेशन होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी होळीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, या सगळ्यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने होळी सेलिब्रेशननंतर तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे आकांक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "गुलाल हो...तो लाल हो...तुमचा फेव्हरेट गुलाल रंग कोणता?" असं कॅप्शन आकांक्षाने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी आकांक्षाला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत "तू पार्वती आहेस आणि असे फोटो?" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "ही कोणती होळी आहे", अशी कमेंट केली आहे. "किमान आजच्या दिवशी तरी असे फोटो टाकू नको" असंही म्हटलं आहे. 

आकांक्षा ही साऊथची अभिनेत्री आहे. तिने हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आकांक्षा सहभागी झाली होती. तर मिका सिंगच्या स्वयंवरमध्येही तिने सहभाग घेतला होता. स्वयंवरमध्ये मिकाने तिला त्याची भावी पत्नी म्हणून निवडलं होतं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 'विघ्नहर्ता गणेश' या मालिकेतील पार्वती या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.

टॅग्स :होळी 2024टिव्ही कलाकार