Join us

नवीन तारक मेहता सचिन श्रॉफ अडकला लग्नबंधनात, जेठालाल अन् बबिताचीही हजेरी, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 14:46 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेतील नवीन तारक मेहताची भूमिका साकारणारा  अभिनेता सचिन ...

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेतील नवीन तारक मेहताची भूमिका साकारणारा  अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लग्नबंधनात अडकला आहे. हे त्याचे दुसरे लग्न आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे. सचिनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली.

सचिन श्रॉफची पत्नी एक इव्हेंट मॅनेजर आहे. ती गेल्या काही वर्षांपासून त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. हे त्याचं अरेंज्ड मॅरेज असून त्याने पत्नीची ओळख कायमच सिक्रेट ठेवली आहे. सध्या दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तारक मेहतामधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता हिने लग्नसोहळ्याला हजेरी लावली. 

सचिन श्रॉफ गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये भूमिका करतो.  'आश्रम' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.सचिनचे यापूर्वा टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिच्यासोबत लग्न झाले होतेय मात्र, नऊ वर्षांच्या लग्नानंतर जानेवारी २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांना समायरा 10 वर्षांची मुलगी आहे.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारलग्न