Join us

अखेर देशमुख कुटुंबात पडणार फूट; बयोबाई करणार घराच्या वाटण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 18:10 IST

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये बयोबाई मोठा निर्णय घेतात.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या लोकप्रिय मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. सिद्धार्थ आणि आदितीने देशमुख कुटुंबापासून विभक्त व्हावं यासाठी आदितीचे आई-वडील कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेत आता महालक्ष्मी घरातील सदस्यांमध्ये भांडणं लावते. याचाच परिणाम म्हणजे घरातील बदललेलं वातावरण पाहून बयोबाई घराच्या वाटण्या करण्याचा निर्णय घेते.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये घरातील बदललेली परिस्थिती पाहून बयोबाई प्रचंड खचून जातात. परिणामी, जर सगळ्यांना स्वतंत्र राहायचं असेल तर घराच्या वाटण्या करुन टाका असं बयोबाई सांगतात. तर, दुसरीकडे घरातलं बिघडलेलं वातावरण पुन्हा नीट करण्यासाठी सिद्धार्थ अमेरिकेच्या नोकरीचा नाद सोडतो आणि पुन्हा मुंबईत जॉब शोधण्यास सुरुवात करतो.

दरम्यान, एकीकडे आदिती आणि सिद्धार्थ देशमुखांचं घर सावरायचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे आदितीचे आई-वडील हे घर तोडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता या लढाईत नेमका कोणाचा विजय होतो? खरंच देशमुख कुटुंबाच्या वाटण्या होणार का? आदिती तिचं घर जोडून ठेवण्यास यशस्वी होईल का?  असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या भागातच मिळतील.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारहार्दिक जोशी