Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझेच मी गीत गात आहे' फेम अवनी तायवाडेची 'अबोली' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:48 IST

'तुझेच मी गात आहे 'या मालिकेत स्वरा नावाची भूमिका साकारून अवनी तायवाडे प्रसिद्धीझोतात आली.  

Avni Taywade: 'तुझेच मी गात आहे ' (tuzhech mi geet gaat aahe) या मालिकेत बालकलाकार स्वराची भूमिका अवनी तायवाडेने(Avni taywade) साकारली होती. अवनीने या मालिकेत तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'तुझेच मी गात आहे' मध्ये सुरांच्या विश्वात हरवलेल्या स्वराने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. असं असलं तरी आता स्वरा नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' या मालिकेतून अवनी तायवाडे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अबोली'मध्ये अवनी 'चार्वी' नावाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच नवनवीन ट्विस्ट आणले जातात. आता 'अबोली' मालिका चार्वीच्या येण्याने कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अवनी तायवाडेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती देण्यात आली आहे . त्यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'तुझेच मी गात आहे ' या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे तसेच तेजस्विनी लोणारी यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळाली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहसोशल मीडिया