Join us

Ufff!! लग्नाआधीच व्हॅकेशनवर गेले राणादा व पाठक बाई, समुद्र किनारी दिली रोमॅन्टिक पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 15:00 IST

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : अक्षया आणि हार्दिकने शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत...

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’  (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील फेमस जोडी म्हणजे राणादा आणि पाठक बाई. मालिकेत काम करता करता अखेर पाठक बाई आणि राणादाचं अर्थात अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हार्दिक जोशीचं (Hardeek Joshi) जमलंच आणि ही जोडी एन्गेज्ड झाली. गेल्या महिन्यात या जोडीचा साखरपुडा पार पडला.

रिल लाईफमधील ही जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र यावी, अशी चाहत्यांची भरून इच्छा होती. पण असं काही घडेल, याची भणकही कुणाला नव्हती. पण या जोडीनं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं आणि चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. सध्या या जोडीची एक रोमॅन्टिक पोस्ट व्हायरल होतेय.

होय,  अक्षया देवधरहार्दिक जोशी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लग्नाआधीच दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. दोघांनीही बीचवरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. बोईसर येथील नांदगाव समुद्र किनाºयावरचा हा फोटो पाहून चाहतेही क्रेझी झाले आहेत. ‘माझ्या पूर्णत्वासाठी तुझ्या पे्रमाची गरज आहे,’ असं कॅप्शन अक्षयानं या फोटोला दिलं आहे. यावर हार्दिकनं केलेली कमेंटही खास आहे. ‘मी तुझ्याशिवाय काहीच नाही, माय लव्ह,’ असं त्याने लिहिलं आहे.

अक्षया व हार्दिक दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघेही सतत आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली होती. ही ऑनस्क्रीन जोडी आता आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे सेलिब्रिटी कपल आता विवाह बंधनात अडकणार आहेत. चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार