Join us

सोडमुंज झाली..जातो आता काशीला! 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, शेअर केले Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:53 IST

अभिनेत्याच्या पोस्टवर होणाऱ्या बायकोचीही मजेशीर कमेंट

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तू चाल पुढं' मधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारणारा विक्रम मोहिते माहितच असेल. अभिनेता ध्रुव दातारने (Dhruv Datar) ही भूमिका साकारली आहे. खऱ्या आयुष्यात ध्रुव लवकरच लग्नबंधनात अडकणार असून नुकतीच त्याची सोडमुंज पार पडली. मजेशीर कॅप्शनसह त्याने सोडमुंजीचे फोटो पोस्ट केलेत. 

अभिनेता ध्रुव दातारचा  १४ मे रोजी साखरपुडा झाला. मैत्रीण अक्षता तिखेसोबत तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी नुकतीच त्याची सोडमुंज पार पडली. या विधीचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. सोबत मजेशीर कॅप्शन देत लिहिले, 'सोडमुंज झाली..जातो आता काशीला..बाय!'

ध्रुवच्या या पोस्टवर होणारी बायको अक्षता तिखेनेही त्याची मजा घेतली. तिने कमेंट करत लिहिले, 'तयार राहा, येते तुला काशीला घ्यायला.'

कोण आहे अक्षता तिखे? 

अक्षता तिखे ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून आता ती कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहे. मेराकी नावाने तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे.दातार आणि अक्षता तिखे दोघेही कॉलेज पासूनचे मित्र आहेत. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मे महिन्यात त्यांनी साखरपुडा केला आणि आता या महिन्यात हे दोघेही विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया