Join us

कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:09 IST

Deepa Chaudhari: दिपा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने अलिकडेच तिच्या कोकण दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब-चौधरी (Deepa Chaudhari) हिने प्रदीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत अश्विनी ही भूमिका साकारुन दिपाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सध्या तिचा तुफान मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत असलेली साधीभोळी अश्विनी खऱ्या आयुष्यातही तितकीच साधी आहे. सध्या तिने मालिकेतून ब्रेक घेतला असून उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ती कोकणात गेली आहे.

दिपा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने अलिकडेच तिच्या कोकण दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यात सध्या ती कोकणात तिच्या गावी मुलासोबत सुट्टी एन्जॉय करतीये.

दरम्यान, दिपाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मुलासोबत तिचं संपूर्ण कुटुंब दिसून येत आहे. दिपाचं कोकणातलं घर आंबा-फणसाच्या झाडांच्यामध्ये वसलं असून चहुबाजूला हिरवळ असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यावेळी दिपाच्या लेकाची प्रिंन्सची उन्हाळ्याची सुट्टी निर्सगाच्या सानिध्यात गेल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनकोकण