Join us

फोटोमधील 'या' चिमुकल्या मुलाला ओळखलं का? 'तारक मेहता..'मध्ये साकारतोय महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:14 IST

Shailesh lodha: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

गेल्या १३ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ulta chashma). या मालिकेतील कलाकारांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. म्हणूनच, या कलाकारांविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला आज 'तारक मेहता का उल्टा चश्मा 'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून जवळपास ४० वर्षांपूर्वीचा हा फोटो असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर हा फोटो पाहिल्यावर त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो 'तारक मेहता' या मालिकेत तारक ही भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा (shailesh lodha) यांचा आहे. शैलेश यांनी एका काव्यसंमेलनात लहानपणी भाग घेतला होता. त्यावेळचा हा फोटो असल्याचं पाहायला मिळत आहे. "३० सप्टेंबर १९८१ सालचा हा फोटो. ज्यात मी साधारणपणे १० हजार लोकांसमोर माझी कविता सादर केली होती. हा फोटो ३० सप्टेंबर १९८०-८१ च्या काळातला आहे. म्हणजे बरोबर आजच्या दिवशी याला ४० वर्ष पूर्ण झाले", असं कॅप्शन शैलेश लोढा यांनी दिलं आहे. सोबत त्यांनी या फोटोमागील एक किस्साही शेअर केला आहे.

दरम्यान, शैलेश लोढा यांच्या या फोटोवर आतापर्यंत ५३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. तर कमेंट्सचा नुसता वर्षाव होत आहे. शैलेश लोढा यांनी या  मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.  विशेष म्हणजे या मालिकेच्या एका भागासाठी ते साधारणपणे १.५ लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन