Join us
Daily Top 2Weekly Top 5

मायेची ऊब... सायली संजीवनं बाबाच्या आठवणीत तयार करून घेतली ही खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 10:50 IST

Sayali Sanjeev : सायलीनं तिच्या बाबाच्या आठवणीत एक सुंदर टॅटू गोंदवून घेतला होता. बाबा तुझ्यासाठी, असं लिहित त्याचा फोटो तिनं शेअर केला होता. आता पुन्हा सायलीनं तिच्या बाबांच्या आठवणीत एक खास गोष्ट तयार करून घेतली आहे.

Sayali Sanjeev Latest Post For Her Father : झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev ) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे, कधी टॅटूमुळे तर कधी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेमुळे़ सध्या सायली एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे.

तुम्हाला आठवत असेलच की, सायलीनं तिच्या बाबाच्या आठवणीत एक सुंदर टॅटू गोंदवून घेतला होता. बाबा तुझ्यासाठी, असं लिहित त्याचा फोटो तिनं शेअर केला होता. आता पुन्हा सायलीनं तिच्या बाबांच्या आठवणीत एक खास गोष्ट तयार करून घेतली आहे. होय, सायलीनं बाबाच्या नावाची गोधडी शिवून घेतली आहे़ त्याचा फोटोही तिनं शेअर केला आहे.

पिंक रंगाच्या या गोधडीवर सायलीच्या बाबाचं संजीव हे नाव धाग्यांनी विणलेलं आहे़ गोधडीसोबतचा सुरेख फोटो शेअर करत सायलीने त्याला भावूक कॅप्शनही दिलं आहे. ‘संजीव... बाबाच्या नावाची गोधडी... किती आभार मानू मी तुमचे? आता मी हक्काने तुमच्याकडून गोधडी बनवून घेणाऱ़ मुन्नाबी बाई तुम्ही माझ्यासाठी ही गोधडी स्वत:च्या हातानं विणली. तुमच्या हातात जादू आहे,’असं तिनं लिहिलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सायलीच्या वडिलांचं निधन झालं.  बाबांच्या आठवणीत तिने एक भावूक करणारी कविताही पोस्ट केली होती.  31 जानेवारी रोजी सायलीनं तिचा वाढदिवस होता. पण डिसेंबरमध्ये तिच्या वडीलांचं निधन झाल्याने बाबांच्या आठवणीत सायली वाढदिवशी भावुक झाली होती. 

वडिलासोबत बालपणीचा फोटो शेअर तिने एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ‘मला अतिशय सुंदर आयुष्य दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद...तुम्हीच माझं सर्वस्व आहात,’ असं तिने या फोटोसोबत लिहिलं होतं. 

सायलीने पहिल्याच मालिकेतून अवघ्या चाहत्यांची मनं जिंकलीत. ‘काहे दिया परदेस’ ही तिची पहिली मालिका. यानंतर आता  ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायलीने साकारलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटातही ती दिसली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयर्सची चर्चा रंगताना दिसते आहे. दोघांच्या सोशल मीडियावरील अ‍ॅॅक्टिव्हिटीवरून चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, याबाबत त्या दोघांनी मौन बाळगलं आहे.

टॅग्स :सायली संजीवटेलिव्हिजनटिव्ही कलाकार