Join us

'...तर मालिका बंद करा', पारु मालिकेतील 'त्या' सीनवर संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 15:10 IST

Paru:ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, त्यातील एका सीनवर आता प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात काही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे पारु. ही मालिका सुरुवातीपासून लोकप्रिय ठरली असून तिचं कथानक प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. मात्र, सध्या या मालिकेवर प्रेक्षकांनी टिकेची झोड उठवली आहे.सध्या सोशल मीडियावर या

मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. हा प्रोमो झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दामिनी गणीला काठीने मारत असल्याचं दिसून येत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी टिकेची झोड उठवली आहे.

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्य दोघंही घराबाहेर एकत्र गेले आहेत. ते नेमके कुठे गेलेत याचा शोध घेण्यासाठी दामिनी आणि दिशा गणीला त्रास देतात. इतकंच नाही तर दामिनीने आहिल्यादेवींसारखा गेटअप केला असून ती गणीला काठीने मारते. 

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोच्या कमेंटमध्ये मालिकेवर प्रचंड टीका केली आहे.  हे 'देवा काय चाललंय हे प्रत्येक सिरियल मध्ये काय काय दाखवता हे. सिरियल नावाच मूळच उपटून टाका एकदाच.', 'विकृती दाखवत आहेत. काय दाखवायचं काय नाही कळत नाही का? मनोरंजन साठी सिरीयल असतात पण ताळ मेळ सोडून काहीही दाखवत आहे.','देवी आई एखद्या छोट्या मुलाला कास काय मारू शकते फालतू पणा आहे हा', 'हे असं काही दाखवायचं असेल तर मालिका बंद करा. काहीच अर्थ नाही दिशा आणि दामिनी खूपच अतिथी करतात.' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीट्रोल