Join us

'ठरलं तर मग' फेम सुमन काकीच्या नवऱ्याला पाहिलंय का? आहे प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:34 IST

अभिनेत्री श्रद्धा वर्तकने मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका साकारली आहे.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. तन्वी आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. मालिका सध्या रंजक वळणार आली असून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. मालिकेत सुमन काकीची भूमिका निभावणारी अभिनेत्री श्रद्धा केतकर वर्तक (Shraddha Ketkar Vartak) बद्दल माहितीए का?श्रद्धाचा नवराही याच क्षेत्रात आहे.

अभिनेत्री श्रद्धा वर्तकने मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका साकारली आहे. श्रद्धा गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. 'चारचौघी', 'आंबट गोड', 'एक डाव भटाचा' अशा सिनेमा आणि नाटकांमधून ती भेटीला आली आहे. श्रद्धाने मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. तर श्रद्धाचा नवराही सिनेक्षेत्राशी संबंधित आहे बरं का.

श्रद्धाच्या पतीचं नाव संचित वर्तकची आहे. तो अभिनेता, दिग्दर्शक आणि व्हॉईस आर्टिस्टही आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याने काम केले आहे. त्यानंतर त्याने दिग्दर्शन केले. संचितने हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. व्हॉईस आर्टिस्ट म्हणून हॉलिवूड चित्रपच, कार्टुन कॅरेक्टर्सना आवाज दिला आहे. सध्या त्याने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून नाव कमावलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताजुई गडकरीटिव्ही कलाकार