Monika Dabade: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या मालिकेचं कथानक त्यातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. तसेच महाराष्ट्रातील घराघरात ही मालिका पोहोचेली आहे. दरम्यान, मालिकेतील सायली-अर्जुनप्रमाणे संपूर्ण सुभेदार कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यासोबत मालिकेत अर्जुनच्या बहिणी अस्मिताचं पात्र साकारुन अभिनेत्री म्हणजे मोनिका दबडे लोकप्रिय झाली. या मालिकेने तिला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. सध्या मोनिका चर्चेत आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती देत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर मोनिका दबडेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री डोहाळजेवणासाठी तयार झाल्याची पाहायला मिळतेय. मोनिकाने अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. परंतु इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टकडून तिच्या डोहाळजेवणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये मोनिकने हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलांचे सुंदर दागिने आणि नाकात नथ असा लूक करुन खास तयार झाली आहे. त्यासोबतच व्हिडीओमध्ये ती म्हणते, "ठरलं तर मग' मध्ये मला बघतच आहात. अस्मिता नावाचं करेक्टर मी करते आहे. माझं खरं नाव मोनिका दबडे आहे. पण, अस्मिता करताना मला जशी छान मजा येते आणि मी वेगळ्या रुपात असते. तसंच लूक आज मला मेकअप आर्स्टिस्टने (साई) दिलं आहे. आज माझं डोहाळजेवण आहे मला सातवा महिना लागलाय."अशी माहिती अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये दिली आहे.