अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. वयाच्या ६९ व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती यांची मुलगी. आईच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली. ज्योती सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनय करत होत्या. ज्योती यांच्या निधनामुळे 'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांना मोठा धक्का बसला. कलाकारांनी भावुक पोस्ट लिहून ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांच्या भावुक पोस्ट 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन लिहिलं की, हे स्वीकार होऊ शकत नाही. तू फसवलंस आजी
'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन अर्थात अभिनेता अमित भानुशालीने भावुक पोस्ट लिहिली आहे. अमितने फोटो शेअर करुन ज्योती चांदेकर यांच्याविषयी लिहिलंय की, "खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस — ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तुझा हसरा चेहरा, तुझा उत्साह, आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील. शांती लाभो आजी… तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन."