जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा अत्यंत लाडका आणि लोकप्रिय चेहरा आहे. पुढचं पाऊल मालिकेतून घराघरत पोहोचलेल्या जुईने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतंच जुई पंढरपूरला गेली होती. विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर तिने पोस्ट लिहिली आहे.
जुईने पंढरपूर मंदिरातील विठुरायाच्या गाभाऱ्यातील फोटो शेअर केले आहेत. ती म्हणते, "त्याचं तेज बघुन हरपलं देहभान...पहिल्यांदा पंढरपूरला जाण्याचा योग आला...तो ही अचानक! त्यानेच बोलावून घेतलं! शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो…लाईन जशी पुढे सरकत होती तसा गाभारा हळूहळू दिसू लागला आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले. डोळे मन भरुन आलं... शांत वाटलं…करण दादा, अभिशेक दादा, साहिल दादा या अनुभवासाठी 🙏🙏🙏🙏 जय हरी विठ्ठल".
सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असते. या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना आवडते. जुईसोबत मालिकेत अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, मोनिका दाभाडे, प्रतिक सुरेश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.