जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेची, मुलीची भूमिका निभावली. पुढचं पाऊल मालिकेतून जुईला प्रसिद्धी मिळाली. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्यासोबतच जुईला गायनाचीही आवड आहे. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ती वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्सही चाहत्यांना देत असते. घटस्थापनेच्या मुहुर्तावर जुईने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
जुईने घटस्थापनेच्या मुहुर्तावर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. जुई अभिनेत्री असण्यासोबतच आता लेखिका म्हणून तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. एका वेब सीरिजचं लेखन जुई करणार आहे. 'unsolved' असं या वेबसीरिजचं नाव आहे. या वेबसीरिजच्या मुहुर्त नुकताच पार पडला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे.
सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असते. या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना आवडते. जुईसोबत मालिकेत अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, मोनिका दाभाडे, प्रतिक सुरेश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.