Join us

रुबीनाने फराह खानला दिला मांसाहार सोडण्याचा सल्ला, कारण सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:33 IST

फराह खान आणि रुबीना दिलैक यांचां कुकिंग व्लॉग प्रचंड व्हायरल झाला आहे.

फराह खान (Farah Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. कोरिओग्राफर असलेल्या फराह खानने काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फराह खानचे यूट्यूब चॅनेलसुद्धा आहे. या चॅनेलवर ती अनेक  सेलिब्रिटींसोबतचे कुकिंग व्लॉग शेअर करत असते. फराह सेलिब्रिटींना आपल्या घरी बोलवते आणि त्यांच्यासोबत स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडीओ बनवते. अलीकडेच अभिनेत्री रुबीना दिलैकसोबत (Rubina Dilaik) फराह हिनं एक कुकिंग व्हिडीओ शूट केला आहे. दोघींनी छान गप्पाही मारल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी रुबिनाने फराह खानला मांसाहार सोडण्याचा सल्ला दिला.

 फराह खान आणि रुबीना दिलैक यांचां कुकिंग व्लॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. फराहशी बोलताना रुबीनाने मांसाहार सोडल्यानंतर शरीरात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "अभिनव आणि मी सात वर्षांपूर्वी मांसाहारी, विशेषतः चिकन, खाणे बंद केले आहे. खरंतर, सुरुवातीला जेव्हा आम्ही दोघेही व्यायाम करायचो, तेव्हा आमचे हातपाय सुजायचे आणि आमचे तळवे जास्त दुखायला लागायचे.  मग मी आणि अभिनवने चिकन सोडण्याचा निर्णय घेतला आणि चिकन सोडल्यानंतर आम्हाला स्वतःमध्ये चांगला बदल जाणवू लागला".

फराह खानला मांसाहार सोडण्याचा सल्ला देत रुबिना म्हणाली, "जर तू मांसाहार सोडला तर तुला शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतील". यावर फराहने विचारलं, "मग मी मासे तरी खाऊ शकते का?" त्यावर रुबिनाने उत्तर दिलं की, "मासे खाणं काही प्रमाणात ठीक असलं तरी शरीराला खरी सुधारणा हवी असेल, तर नॉनव्हेजचं प्रमाण कमीत कमी करणं गरजेचं आहे". रुबिनाने दिलेल्या सल्ल्याचा विचार करत तिनं चिकन कमी करण्याचा प्रयत्न करेल, असं कबूल केलं.

टॅग्स :सेलिब्रिटीफराह खानआरोग्यटिव्ही कलाकारयु ट्यूब