Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी...", कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानची भावुक पोस्ट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:08 IST

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री हिना खानकडे (Hina Khan) पाहिलं जातं.

Hina Khan: हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री हिना खानकडे (Hina Khan) पाहिलं जातं. अलिकडेच तिला जून महिन्यात कर्करोगाचं निदान झाल्याचं कळलं. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला आहे. कर्करोग होऊनही हिना खचलेली नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिनेत्री चाहत्यांना तिच्या प्रकृतीची प्रत्येक अपडेट देत आहे. गेले १५ दिवस हिना रुग्णालयात उपचार घेत होती. कर्करोगामुळे केमोथेरपीसोबतच तिला अजूनही काही उपचार घ्यावे लागत आहेत. त्यानंतर आता ती घरी परतली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तिने हेल्थ अपडेट दिली आहे. 

अगदी काही दिवसांपूर्वीच हिना खानने रुग्णालयातील फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये तिच्या हातात यूरीन बॅग होती, अशा अवस्थेत ती पाहायला मिळाली. त्याचबरोबर हिनाने सोशल मीडियावर घराच्या बाल्कनीत बसून क्लिक केलेले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने भावूक करणारं कॅप्शन देखील लिहिलं आहे. हिनाने लिहिलेल्या कॅप्शन वाचून नेटकरी सुद्धा भावुक झाल्याचे पाहायला मिळतायत. 

हिनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "या प्रवासात गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या फारच कठीण होते. अंगावर अनेक डाग आले आणि न घाबरता या गोष्टींचा सामना केला. खरंतर मला ज्या शारीरिक मर्यादा आणि मानसिक आघातांना सामोरं जावं लागेल त्याला मी कशी बळी पडू शकते? मी धीटपणे त्याचा सामना केला आणि अजूनही करतेय."

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "या सगळ्यातून बाहेर येण्याकरिता आशा आणि सकारात्मक विचारांसोबत मला मनात सकारात्मक चक्र चालू ठेवून संतुलन राखावं लागेल आणि तरच मी आनंदी स्वत:ला आनंदी ठेवू शकेन. हा माझा माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी संदेश आहे." अशी भावुक करणारी पोस्ट हिनाने शेअर केली आहे. 

टॅग्स :हिना खानटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया