Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता अमेय बोरकरच्या पत्नीनं स्वीकारलं नवं चॅलेंज, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून करतेय हे नवं काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:40 IST

Amey Borkar : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांइतक्याच त्यांच्या बायकाही चर्चेत असतात. पण सध्या एका अभिनेत्याच्या बायकोचं वेगळ्याच कारणासाठी कौतुक होतंय.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांइतक्याच त्यांच्या बायकाही चर्चेत असतात. पण सध्या एका अभिनेत्याच्या बायकोचं वेगळ्याच कारणासाठी कौतुक होतंय. होय, या अभिनेत्याचं नाव आहे अमेय बोरकर (Amey Borkar) आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे भक्ती सावंत. तिच्यासाठी अमेयनं एक भारी पोस्ट लिहिली आहे. प्राऊड ऑफ यु बायको, असं लिहित त्याने बायकोच्या जिद्दी,चिकाटी आणि हिंमतीला दाद दिली आहे. अमेयच्या बायकोने असं काय केलं तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं. होय, दूरदर्शनची वृत्तनिवेदिका म्हणून तिला नवी संधी मिळाली आहे आणि यामुळे अमेय भलताच खूश आहे.

बायकोनं नवीन काही करावं, याचा आनंद अमेयनं सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. बायकोसाठी  लिहिलेल्या पोस्टमध्ये अमेय लिहितो, ‘आज दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदिका म्हणून नवीन सुरूवात करते आहेस. तुझ्या चिकाटी आणि हिमंतीला सलाम. सोपं नसतं आपलं सगळं उच्च-शिक्षण, आरामदायी आयुष्य बाजूला ठेवून काही तरी नवीन करून दाखवणं. तू ते करून दाखवलंस आणि तेही स्त्रीत्वाच्या पडणाऱ्या सर्व नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडून. प्राऊड ऑफ यू बायको... यापुढेही अशीच नवीन चॅलेंजेस् स्वीकारत रहा. सोप्या गौष्टींची हौस आहे कोणाला...’ 

अमेयने २०१६ साली भक्ती सावंत हिच्याशी लग्न केलं. भक्ती ही उच्छशिक्षित असून तिने मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. अमेयच्या बाबतीत सांगायचं तर सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत कॅडेट संजयचे पात्र साकारत आहे. याआधी स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत अमेयने ‘सत्या’ची भूमिका साकारली होती. सत्याच्या दमदार भूमिकेमुळे अमेय प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. झी मराठीवरील ‘जाडुबाई जोरात’ या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. डोंबिवली रिटर्न, वर खाली दोन पाय अशा नाटक आणि चित्रपटातून त्याने अभिनय साकारला होता.   

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार