Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:23 IST

तेजश्रीने या स्टोरीमधून चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.

मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 'स्टार प्रवाह'वरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने एक्झिट घेतली तेव्हा सर्वांचीच निराशा झाली होती. ती पुन्हा मालिकेत कधी दिसणार असेच प्रश्न चाहते विचारत होते. तर आता तेजश्रीने नवीन प्रोजेक्टची हिंट दिली आहे. ती मालिका आहे की सिनेमा हे तिने स्पष्ट केलेलं नाही. मात्र ती यासाठी आतुर असल्याचं तिने म्हटलं आहे.

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती या माध्यमातूनच बरेचदा चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.  यामध्ये तिने लिहिले, 'Excited? मी सुद्धा'. तसंच आणखी एक स्टोरी पोस्ट करत ती लिहिते, 'सिनेमा, नाटक की मालिका? कोणत्या माध्यमात बघायला जास्त आवडेल?'. 

तेजश्रीने या स्टोरीमधून चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. मात्र ती नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार यामुळे चाहत्यांना आनंदही झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र टाईम्सच्या रिपोर्टनुसार, तेजश्री एका नव्या मालिकेत दिसणार आहे. तेही सुबोध भावेसोबत. दोघांनी 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता ही जोडी मालिकेतही काम करणार आहे. ही एक प्रेमकथा असणार आहे. मालिकेचं नाव आणि इतर कलाकार याबाबतची माहिती मात्र गुपितच आहे. आता यात नेमकं किती तथ्य आहे हे लवकरच कळेल.

टॅग्स :तेजश्री प्रधान मराठी अभिनेताटेलिव्हिजनमराठी चित्रपट