Join us

Video: गाडी चालवण्यासाठी तेजश्रीने हातात स्टेअरिंग घेतलं, पण लगेचच खाली उतरावं लागलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:01 IST

तेजश्री प्रधानचा वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तेजश्री अचानक गाडीतून खाली उतरली. काय घडलं?

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजश्रीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. तेजश्रीने मालिकाविश्वातही स्वतःची ओळख निर्माण केलीय. तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तेजश्री स्वानंदीची भूमिका साकारत आहे. तेजश्रीचा मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झालाय. त्यावेळी तेजश्रीच्या भाबड्या आणि निरागस स्वभावाने सर्वांचं मन जिंकलंय. काय घडलं नेमकं?

तेजश्री गाडी चालवायला बसली इतक्यात...

तेजश्रीचा एक व्हिडीओ मीडिया पेजने शेअर केलाय. या व्हिडीओत तेजश्री एका रस्त्यावर मालिकेचं शूटिंग करताना दिसतेय. त्यावेळी सर्वांशी बोलता बोलता तेजश्री गाडीत जाऊन बसते. तेव्हा तिचं लक्ष एका कॅमेरात जातं. तेजश्री कॅमेराकडे बघून हात दाखवते आणि हसते. पुढे तेजश्री गाडी सुरु करायला जाते. ती आजूबाजूला बघते. पुढे ती गाडीचं दार उघडते आणि हसतच म्हणते, ''ये ऐका ना! माझ्या गाडीची चावी नाहीये माझ्याकडे.'' तेजश्री असं म्हणताच इतरही सर्वजण हसायला लागतात. तेजश्रीच्या सहकलाकारांनाही अभिनेत्रीचा हा निरागस स्वभाव बघून हसू आवरलं नाही.

तेजश्री प्रधान नंतर अभिनेत्री किशोरी आंबियेंना सोबत घेऊन गाडी सुरु करुन निघून गेली. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करुन तेजश्रीच्या निरागस वेंधळेपणाचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलंय. तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत अभिनय करत आहे. या मालिकेत सध्या समर आणि स्वानंदीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. तेजश्री मालिकेत साकारत असलेल्या स्वानंदीच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होतंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashri tries driving, but fails hilariously due to missing keys.

Web Summary : Actress Tejashri Pradhan, known for her roles in movies and TV serials, recently tried to drive a car on set but hilariously realized she didn't have the keys. This innocent moment, captured in a video, charmed her colleagues and fans alike. She stars in 'Veen Dogantali Hi Tutena'.
टॅग्स :तेजश्री प्रधान सुबोध भावे टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता