Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता..'मध्ये पुन्हा येण्यास दिशा वकानी होती तयार; ऐनवेळी एका कारणामुळे दयाबेनने घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:46 IST

Tarak mehta ka ooltah chashmah: सध्या या मालिकेसाठी नव्या दयाबेनचा शोध घेतला जात आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak mehta ka ooltah chashmah). या मालिकेने जवळपास ११-१२ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. जेठालाला, टप्पू, बबिताजी, भिडे मास्तर, हाथी भाई, पोपटलाल यांसारख्या अनेकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. मात्र, गेल्या काही काळापासून या मालिकेवर प्रेक्षक नाराज आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिला पुन्हा मालिकेत घ्या असा एकच धोशा प्रेक्षकांनी लावला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दिशा वकानी हिची पुन्हा एन्ट्री होणार होती. मात्र, एका कारणामुळे पुन्हा तिने माघार घेतल्याचं सांगण्यात येतं.

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. त्यानुसार, दिशा वकानी मालिकेत यायला तयार होती, परंतु, ऐनवेळी तिने माघार घेतली. त्यामुळे या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत ती दिसणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला होता. त्यानुसार, दिशा मालिकेत पुन्हा येणार होती. या व्हिडीओविषयी आता असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "दिशासोबत माझं बोलणं झालं होतं ती पुन्हा यायला तयार सुद्धा होती. पण, शेवटच्या क्षणी असं काही झाली की आम्हाला पुन्हा निर्णय बदलावा लागला. त्यामुळे या मालिकेत आम्ही पुन्हा दिशाला आणू शकत नाही", असं असित मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या मालिकेत पुन्हा दिशाने काम करावं असं आम्हाला वाटतं. पण, तिचं लग्न झालं असून तिला २ मुलं आहेत. त्यामुळे तिचं पर्सनल लाइफ आणि निर्णय यांचा मान ठेवणं गरजेचं आहे. ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे. त्यामुळे तिला तिची स्पेस द्यावी हे मला माझं कर्तव्य वाटतं."

दरम्यान, दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुद्धा सुरु झाले आहेत. त्यामुळे या भूमिकेला न्याय देणारी कोणती अभिनेत्री सापडली तर लवकरच त्याचीही जाहीरपणे घोषणा करु असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन