Join us

'तांबडी चामडी'वर नाच पक्का अन् मिळाला मिड वीक Eviction चा धक्का, कोण जाणार घराबाहेर?

By देवेंद्र जाधव | Updated: October 3, 2024 10:23 IST

आज घरात मिड वीक एविक्शन पार पडणार आहे. याशिवाय तांबडी चामडी फेम DJ KRATEX ची घरात एन्ट्री होणार आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीचा नवीन सीझन थोड्याच दिवसात संपणार आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले होते. परंतु चॅनलने घेतलेल्या निर्णयामुळे हा सीझन १०० नव्हे तर ७० दिवसांवर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या रविवारी बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्याआधी आज घरात मिड वीक एविक्शन पार पडणार आहे. नॉमिनेट असलेल्या सदस्यांपैकी एकजण आज बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. याशिवाय आज घरात तांबडी चामडी गाण्यामागचा DJ KRATEX एन्ट्री करणार आहे.

तांबडी चामडीवर डान्स अन् 

बिग बॉस मराठीच्या घरात आज सध्या जगभर गाजलेल्या गाण्यामागचा संगीतकार KRATEX ची एन्ट्री होणार आहे. KRATEX 'तांबडी चामडी' गाण्यावर घरातील सदस्यांसोबत थिरकताना दिसणार आहे. KRATEX च्या गाण्यावर नाचताना घरातील सदस्यांचा मूड एकदम फ्रेश होणार आहे. काहीच दिवसांमध्ये ग्रँड फिनाले असल्याने सर्वांच्या मनात थोडीशी भिती असेल.  KRATEX च्या गाण्यावर थिरकताना सदस्यांचं टेन्शन थोडंफार कमी होईल. तोच बिग बॉस एक मोठा निर्णय सांगतात.

आज होणार मिड वीक एविक्शन

सदस्य मस्त डान्स करत असतात. तोच बिग बॉस सर्वांनाच एक धक्का देतात. आज घरात मिड वीक एविक्शन पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार,  वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण हे सहा जण नॉमिनेट झाले आहेत. या सहा जणांपैकी कोण घराबाहेर जाणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकरटेलिव्हिजनकलर्स मराठी