'बिग बॉस मराठी'च्या घरातून घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण आता मोठ्या पडद्यावर धमाल करत आहे. त्याच्या प्रमुख भूमिकेतील 'झापुक झुपूक' हा सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सूरजने 'बिग बॉस मराठी'मधील आपल्या सर्व सहस्पर्धकांच्या खास भेटी घेतल्या. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यासोबत खास व्हिडीओ बनवले. यासोबतच त्याने निक्की तांबोळी हिचीदेखील भेट घेतली. यावेळी सुरज आणि निक्कीनं 'झापुक झुपूक' चित्रपटातील "वाजीव दादा..." या गाण्यावर भन्नाट डान्स केला.
सुरजने दोघांच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अंकाउटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओला "निकी तू दिलेल्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी तुझं काळजापासून मनापासून धन्यवाद" असं छान कॅप्शनही दिलं आहे. सुरज आणि निक्की या डान्सला नेटकऱ्यांनी पसंती दाखवली आहे. यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स सुद्धा येताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात निक्की आणि सूरजमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. निक्कीने सूरजला अनेकदा आधार दिला आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या. एवढंच नाहीतर जेव्हा सूरजचा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा निक्कीनं चाहत्यांसाठी अख्खं थिएटर बुक करुन पाठीमागे उभं राहिली.
दरम्यान, "वाजीव दादा..." हे गाणं सूरज चव्हाणसह जुई भागवत, हेमंत फरांदे आणि 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामधील कलाकारांसोबत चित्रित केलं गेलं आहे. 'झापुक झुपूक' सिनेमात सूरज चव्हाण शिवाय जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या अंतिम सोहळ्यात सूरज चव्हाणवर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती.